धाराशिव /प्रतिनिधी

 कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक मा. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तिर्थ खुर्द येथे तलाव खोलीकरणचे काम प्रगतिपथावर आहे. 6 मार्च रोजी सुरु झालेले हे काम 50 अक्के पुर्णत्वास आले आहे. चार कोटी लिटर क्षमतेच्या या तलावात संपुर्ण खोलीकरणानंतर सुमारे आठ ते साडे आठ कोटी लिटर पाणीसाठा येळो होऊ शकणार असल्याचे कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.दयानंद वाघमारे यांनी सांगितले. जागतिक जल दिवसाच्या निमित्ताने  आयोजित पाणी परिषद व सेंद्रीय शेती मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान या कामाची जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

 कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्ट मार्फत गेल्या दोन वर्षापासून तुळजापूर तालुक्यात सर्वांगीण विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कामाला एचडीएफसी बाकेमार्फत सीएसआरअंतर्गत अर्थसाह्य करण्यात आलेले आहे. बावकऱ्यांच्या सहकार्यातून तलावातील मुरुम व गाळ काढण्यात येत असुन तलावाभोवती वृक्षलागवड करुन सेशोभिकरण करण्यात येणार आहे. बालाजी अमाइन्सच्या वतीने सिमेंट पाईप लावण्यात येत आहेत. तलावालगतच्या स्मशानभुमी परिसरात असलेली विहिर बुजवून सपाटीकरण करुन तेथेही वृक्षलागवड  करण्यात आलेली आहे. या कामाला जिल्हा पोलीस अधिक्षक मा. अतुल कुलकर्णी यांचे मोठे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचेही प्रकल्प व्यवस्थापक डॉ. वाघमारे यांनी सांगितले.

 तलाव खोलीकरणाच्या कामाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक मा. अतुल कुलकर्णी की, या गावातील लोकांनी पाणीटंचाईबाबत सांगितले होते. येथे कोव्हिजन फाउंडेशन मार्फत आधीपासूनच काम सुरु असल्यामुळे तलाव खोलीकरणाच्या कामाची संकल्पना मांडून मार्च महिन्यात प्रत्यक्ष काम सुरु केले. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने या कामाची पाहणी करुन आणखी काही सुचना करण्यात आल्या असुन येथे चांगल्या प्रकारे  पाणीसाठा झाल्यास पाणीटंचाई दुर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर येथे गावक-यांनसाठी एक वॉकींग ट्रॅक तयार करण्यात येणार असुन, पावसाळयाच्या सुरुवातीला वृक्षारोपन करणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.

 सदर कार्यक्रमासाठी यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. रमेश जारे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे, माजी कृषी तज्ञ डॉ. शहाजी नरवडे, कोव्हिजन फाउंडेशन ट्रस्टचे व्यवस्थापक डॉ. वाघमारे, सरपंच बिरुदेव सोनबक्के, उपसरपंच संतोष डांगे, उदस्य विनोद जाधव, विश्वंभर पटाडे, सुरेखाताई कानडे यांची प्रमुख उपस्थिती होते. तसेच तिर्थ (खुर्द) येथील ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थितीत होते.

 
Top