धाराशिव /प्रतिनिधी
सेंद्रीय शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयासह जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे येथील आवारात सेंद्रीय शेती मालाच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. दर आठवडयाला सेंद्रीय शेतीमालाचा बाजार भरवण्यात येणार असुन, पोलीस अंमलदाराने सेंद्रीय उत्पादने खरेदी करावीत, असे आहवान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
तुळजापुर येथील पोलीस ठाणे आवारातील सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्राला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती मालाचे उत्पादन करणा-या शेतक-यांची बैठक नुक्तीच घेण्यात आलेली होती. याबैठकीत सेंद्रीय शेती मालाची विक्री करण्यासाठी ऑरगॉनिक मॉल व धारशिव जिल्हयाचा स्वातंत्रय ब्रॅड करण्याबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस मुख्यालयासह जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात आठवडयातुन एक दिवस सेंद्रीय भाजीपाला व इतर उत्पादनाचा बाजार भरविण्यात येत आहेत. या भाजीपाल्यासाठी विशिष्ट दर ठरविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावेळी सांगितले.
ॲपद्वारे होणार सेंद्रीय शेतीमालाची विक्री ! बदलते हवामान, शेतीमालाला मिळणारा कमी भाव व इतर कारणामुळे शेतक-यांच्या अत्महत्या वाढत आहेत. तसेच आर्थीक किंवा शेतीच्या बांधाच्या कारणावरुन शेतक-या शेतक-यामध्ये वाद होवुन गुन्हयाच्या घटना देखील घडतात. अशा घटना रोखण्यासाठी सेंद्रीय शेती मालाची बाजारपेठ निर्माण करण्यात येत असुन, या मालाकरीता सेंद्रीय उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर शेतीमालाच्या विक्रीसाठी एक ॲप देखील विकसीत करण्यात येत असुन, या ॲपद्वारे शेत माल उत्पादक ते थेट ग्राहक अशी विक्री करता येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अमर मगर, धीरज पाटील, गोकुळ शिंदे, आबासाहेब कापसे, राजकुमार रोचकरी, अनंद कंदले, उपविभागीय पोलीस अधीकारी गितांजली दुधाने, पोलस निरीक्षक, अजिनाथ काशीद तसेच शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर, नागरीक पोलीस अंमलदार उपस्थितीत होते.