परंडा/ प्रतिनिधी-

 कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय डोमगाव ची विद्यार्थिनी कु.माधुरी प्रताप जाधव हिने महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता class-2 (श्रेणी - ब) या पदासाठी राज्यातून मुलीमध्ये ३ रा व गुणानुक्रमे ११ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिचे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ.सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या संवाद निवासस्थानी अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुबोधसिंह ठाकूर, कल्याणसागर परंडाचे मु.अ.किरण गरड, अंगद लांडगे, दादासाहेब सुरवसे, राजाभाऊ शिंदे, कुंडलिक चव्हाण, सारंग ठाकूर , महादेव जाधव, कैलास जाधव, समाधान जाधव, श्रीकांत जाधव, ऋषीकेश जाधव व तिचे वडील श्री.प्रताप जाधव उपस्थित होते.


 
Top