कळंब प्रतिनिधी - 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये वाढता स्थूलपणा आणि कुपोषण या गंभीर समस्या असुन त्या रोखण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असे मत आय एम ए चे माजी प्रदेशाध्यक्ष व बालरोग तज्ञ डॉ रामकृष्ण लोंढे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय बालरोग परिषद धाराशिव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील स्थूलपणा व कुपोषण या विषयावर जनजागृती अभियान संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून कळंब शहरातील सर्व शाळा व महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांना या विषयी माहिती देण्यात येत आहे. 

अखिल भारतीय बालरोग परिषद धाराशिव जिल्याध्यक्षा डॉ सुचेता पोफळे, सचिव डॉ नामदेव बिराजदार ( उमरगा), कळंब शाखेचे अध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड सचिव डॉ सत्यप्रेम वारे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहर व तालुक्यात हे अभियान राबविले जात आहे.

विद्याभवन हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले प्रशाला, मॉडेल इंग्लिश स्कूल आदी ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करण्यात आली. या वेळी स्थूलपणा होण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम, त्याला जोडुन होणारे विविध आजार, स्थूलपणा रोखण्यासाठी घरेलू संतुलित आहार, बंद पॉकेटातील व तेलकट पदार्थ कमी खाणे, नियमित दररोज कमीत कमी एक तास व्यायाम करणे या विषयी स्त्री रोग तज्ञ डॉ सत्यप्रेम वारे व बालरोगतज्ज्ञ डॉ रामकृष्ण लोंढे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक वृंदा नी विचारलेल्या प्रश्नांचे शंका समाधान करण्यात आले. त्यांना डॉ कमलाकर गायकवाड, डॉ अभिजित लोंढे, डॉ श्याम चौधरी, डॉ पुरूषोत्तम पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. 

यापुढे विद्यार्थ्यांच्या दाताच्या समस्या आणि रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन अभियान सुरू करणार असल्याचे डॉ रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले.

 
Top