तुळजापूर  / प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने दि. 04 मार्च 2023 ते दि. 30 मार्च 2023 या कालावधीत "स्वच्छोत्सव-2023" अभियान साजरा करण्यात येणार. त्यानुसार या अभिनास सुरुवात झाली आहे. 

तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने तुळजापूर शहरांमध्ये केंद्र शासनाच्या द्वारे निर्देश दिल्यानुसार  दि. 07 मार्च 2023 ते दि. 30 मार्च 2023 या कालावधीमध्ये "स्वच्छोत्सव-2023" अभियान साजरे करण्यात येणार आहे. या अभियानाच्या कालावधीमध्ये स्थानिक महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृध्दींगत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांच्या स्वच्छतेमधील सहभागापासुन ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हा आहे. या अभियानामध्ये महिलांना स्वच्छते विषयक केलेल्या उत्कृष्ट कार्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

 यासाठी दि. 15 मार्च 2023 ते दि. 05 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज तुळजापूर नगरपरिषदेमध्ये सादर करण्याचा कालावधी आहे. या अभियाना अंतर्गत दि. 29/03/2023 रोजी स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथेचे आयोजन करण्यात येणार आहे.या अभियानामध्ये शहरातील सर्व महिलांसह नागरिकांनी सहभागी होऊन तुळजापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन  योगेश खरमाटे, प्रशासक व  अरविंद नातू, मुख्याधिकारी यांनी केलेले आहे.


 
Top