धाराशिव / प्रतिनिधी-

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आडमुट्टी भूमिका घेणाऱ्या राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी उद्यापासून संपावर जात असून राज्याच्या उत्पन्नातील 65 टक्के रक्कम जर पगारावर खर्च होत असेल ,आसामचा पगार खर्च 83% होणार असेल, बिहारचा प्रशासन खर्च 90% असेल तर कोणतेही सरकार भविष्यात नोकर भरती करणार नाही, कंत्राटी कर्मचारी भरेल तेव्हा तिजोरी ही सोन्याची कोंबडी आहे. आज भरमसाठ पगार घेऊन उद्याच्या आपल्या मुलांच्या नोकरीची दारं बंद करण्याचे कुटील कारस्थान करणाऱ्या जुन्या पेन्शन साठी संपावर जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे व त्यांच्या जागी लाखो तरुण बेरोजगारीने त्रस्त आहेत त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे भरती करण्यात यावी असे स्पष्ट मत  जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.


 
Top