उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे यांना शिवजयंती निमित्त सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, मुक्ता फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय व्यक्तिवेद पुरस्काराने शिवजयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर येथे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत मा. खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, मा. आमदार राजू आवळे, यांच्या शुभ हस्ते व्यक्तिवेद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी 28 दर्जेदार ग्रंथाचे लेखन केलेले आहे, 63 शोधनिबंधाचे प्रकाशन केलेले आहे. तर ठिबक सिंचन या ज्वलंत विषयावर त्यांनी पीएच.डी.चे संशोधन केलेले आहे. त्यांनी अनेक वेळा स्पर्धा परीक्षा आणि नेट, सेट या परीक्षा संबंधी आकाशवाणीवर मुलाखती दिलेल्या आहेत.व महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. त्यांची 'वळण' ही ग्रामीण कादंबरी सुप्रसिद्ध आहे. प्रा.डॉ. मारुती लोंढे यांनी दोन लघुपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.

  या पुरस्काराबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, माजी सह सचिव डॉ. अशोक करांडे, प्रा.प्रमोद शहा ,प्राचार्य डॉ. बी. एच.दामजी , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे, सामाजिक शास्त्राचे संचालक प्रोफेसर डॉ. गौतम कांबळे यांनी डॉ.लोंढे यांचे अभिनंदन केले. या पुरस्काराबद्दल डॉ.लोंढे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
Top