परंडा / प्रतिनिधी-

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय सह शहरात रविवार दि.२० रोजी ठीक ठीकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील पर्यवेक्षक प्रा दत्तात्रेय मांगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या .छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले .

  कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते .यावेळी स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, हिंदी विभाग प्रमुख डॉ बी वाय माने, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने, प्रा दीपक हुके, वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षीरसागर तसेच जयवंत देशमुख, बबन ब्रह्मराक्षस, सुभाष शिंदे, भागवत दडमल, वसंत राऊत, दत्ता आतकर ,आणि रामराजे जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.


 
Top