कळंब / प्रतिनिधी-

बाजार समिती ने वाढवलेले भूखंड भाडे व परवाना शुल्क पूर्वी प्रमाणे घेण्यात येणार  आहे, येथील व्यापाऱ्यांनी बाजार समिती च्या विरोधात धरणे आंदोलन केले होते, या नंतर प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे.या आंदोलना मुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 कळंब येथील बाजार समिती ने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता, परवाना नूतनीकरण करण्या साठी व  भूखंड भाड्यात वाढ केली होती. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता, व धरणे आंदोलन केले होते. या नंतर प्रशासक फासे व सचिव दत्तात्रय वाघ यांनी भाडे वाढ व परवाना  शुल्क मधील वाढ तात्पुरती मागे घेतली असून, गेल्या वर्षी जेवढे भाडे भरले आहे, तेवढेच भाडे भरण्याच निर्णय दिला आहे. या साठी शिवसेना ठाकरे गट, भा.ज. युवा मोर्चा, व्यापारी संघटना, स्वराज इंडिया यांनी निवेदन दिले होते.

 धरणे आंदोलना मध्ये सतीश टोणगे, भागवतराव धस, विलास बाप्पा करंजकर, ॲड. मनोज चोंदे,स्वराज इंडिया चे तालुका अध्यक्ष अंगद टेकाळे,दिलीप लोमटे, रोहन पारेख,सुनील मगर , संजय घुले,विकास यादव, भा.ज.यु.मो चे अध्यक्ष प्रशांत लोमटे, सतीश लांडगे, निखिल भडगे,मकरंद पाटील, संतोष पवार, सिध्देश्वर कल्साईत, शेख खालील, अजय जाधव,प्रा.दिलीप पाटील,कांतीलाल बाग्रेचा, संतोष धस,अरुण चव्हाण, पप्पू पडवळ,  आदी दोनशे व्यापारी उपस्थित  होते. या वेळी बाजार समिती चे मा. सभापती शिवाजी कापसे, मा. नगर अध्यक्ष संजय मुंदडा, यांनी व्यापाऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

 
Top