उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 फळबाग लागवड योजने अंतर्गत शेवगा लागवड केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे बिल देण्यात यावे यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. मात्र तांत्रिक कारण सांगून सांगून बिल निघणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे दि.१ मार्चपर्यंत बिल न दिल्यास उस्मानाबाद पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा संतप्त शेवगा लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.२१ फेब्रुवारी रोजी दिला आहे.

 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास २८० हेक्टर क्षेत्रावर शेवग्याची लागवड केलेली आहे. दहा महिन्यापासून शेगवा लागवड केलेले शेतकरी लाभार्थी व रोजगार सेवक मागणी अर्ज भरून देत आहेत. मात्र पंचायत समितीचे संबंधित अधिकारी तांत्रिक कारण सांगून मस्टर काढत नाहीत. त्यामुळे शेवगा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या शासकीय लाभापासून वंचित रहावे लागत आहे. त्यातच यावर्षी अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार शेगाव लागवड करावी लागलेत नाही. त्यासाठी त्यांनी कर्ज काढून ही लागवड केलेली आहे. मात्र लागवडीसाठी देण्यात येणारे अनुदान देण्यास पंचायत समितीचे शेतकरी जाणूनबुजून चालढकल करीत आहेत. विशेष म्हणजे बरेच शेतकरी त्यांच्या शेतात असलेल्या शेवगा झाडा शेवग्याच्या शेंगा लागल्या असल्यामुळे त्यांनी विक्री देखील चालू केले आहे. परंतू मायबाप सरकार व प्रशासनाला त्या शेतकऱ्यांची दया येत नाही. त्यामुळे शेतकरी हातात झाले असून ते अनुदान मिळावे यासाठी पंचायत समितीकडे हेलपाटे मारुन सतत निवेदनाद्वारे मागणी करीत आहेत. आर्थिक वर्ष मार्च अखेरीस संपत आले असून देखील केवळ तांत्रिक चूक या नावाखाली पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या चुकीवर पांघरून घालण्याचा किळसवाणा प्रकार केला जात आहे. त्यामुळे दि.१ मार्च पर्यंत अनुदान न दिल्यास दोन मार्च रोजी पंचायत समितीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी जगदीश पाटील, शरद शिराळ, बालाजी तेरकर, श्रीकांत तेरकर, अमोल खराडे, अजित बोचरे, प्रशांत शिंदे, पांडुरंग मारवडकर, दत्तात्रय गुंड, अमोल देशमुख, भीमदेव माने, गोपाळ माने, अमोल सुरवसे, प्रशांत सोनटक्के, मनोज सुरवसे, लक्ष्मण सुरवसे, सुनील भुतेकर, हनुमंत गरड, कंचेश्वर डोंगरे, दशरथ बोडखे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top