उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्यदिव्य मिरवणुकीत सौ. स्नेहलता देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांचा  सोन्याचा नांगर हा सजीव देखावा सादर केला. मिरवणुकीत या देखाव्याने आबालवृद्धांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे ग्रामस्थांसह पालकांनी कौतुक केले.

 हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोकी येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सौ. स्नेहलता देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांचा  सोन्याचा नांगर हा सजीव देखावा सादर केला. त्याचबरोबर शाळेच्या लेझिम पथकानेही बहारदार सादरीकरण करून शिवप्रेमींनी वाहवा मिळवली.

 याव्यतिरिक्त एक लक्षवेधक संकल्पना प्रशालेतील श्री कोतवाल सर यांनी प्रथमच सादर केली. शिवचित्र प्रदर्शन साधारणपणे 250 शिवकालीन गडकिल्ले व अतुलनीय शौर्य व अमरत्व प्राप्त करणारे मावळे यांची स्मारके समाधी इत्यादी चित्रे यांचे भव्य प्रदर्शन शाळेच्या वतीने गावामध्ये मांडण्यात आले होते . सदरील चित्र प्रदर्शनाला ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला . ग्रामस्थांनी पूर्वी कधीही ज्ञात नसलेली माहिती चित्ररूपाने मिळाल्याने सदरील शिवचित्र प्रदर्शनाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. सदरील शिवचित्र प्रदर्शनासाठी राज ढवळे यांनी सहकार्य केले.

 याप्रसंगी संस्था सचिव पांडुरंग देशमुख, ढोकी गावचे उपसरपंच अमोल पापा समुद्रे, नव्हूश नारायण समुद्रे, संग्राम देशमुख, पांडूरंग वाकुरे,  राहूल पाटील, बबनदादा देशमुख यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

 सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शिक्षक एस. जी.  कळकुंबे  प्रशालेतील शिक्षक  चव्हाण ,   कुरुळे,  कोतवाल,   गोळे,   देशमुख, कांबळे,  पाळवदे तसेच शिक्षकेतर कर्मचारी आबा मुळे, अण्णा कांबळे, श्रीमती घोटकर यांनी परिश्रम घेतले.


 
Top