उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.त्याअनुषंगाने दि.23 फेब्रुवारी 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचा वीर बलिदान दिन साजरा करण्यात येणार आहे.वीर बलीदान दिनांच्या अनुषंगाने सकाळी 11.00 वाजता सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालये या ठिकाणी एक मिनीटाचे मौन पाळून हुतात्मा वेदप्रकाश आर्य  यांना विनम्र श्रध्दाजंली अर्पण करण्यात यावी.असे जिल्हाधिकारी डॅा.सचिन ओम्बासे यांनी सुचित केले.      


 
Top