धाराशिव / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती मोर्चाची बैठक ॲड रेवण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी सुरेश शिवाजीराव शेळके यांचे नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी जाणीव अस्मिता साहित्य परिषदेचे अध्यक्ष राम गायकवाड मुक्ती मोर्चाचे सल्लागार डॉ. बशारत अहमद, दत्तात्रय खरात, श्याम सारस्वत, जयसिंग पवार, तसलीम काझी, अनुरथ कांबळे, फिरोज खान पठाण आदी उपस्थित होते .या बैठकीत मुक्तीमोर्चाचे संघटन, जिल्हा कार्यकारणी तयार करून स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात चळवळ उभी करण्याचे सुरेश शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


 
Top