तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर येथील क्षञिय कुलावंस (मावळा ) प्रतिष्ठानाने पारंपरिक  वाद्य चित्तथारक  साहसी खेळाचे प्रात्यक्षिकासह भव्यदिव्य नेञ दिपक मिरवणूक काढुन शिवजयंती उत्सव साजरी केली. 

प्रारंभी शुक्रवार पेठ येथे शिवमुर्तीचे पुजन  उपस्थितीत करण्यात येवुन मिरवणूक आरंभ झाला. या मिरवणूकीत  हत्ती, घोडे ,छञी आबदागीरी तसेच माळशिरस येथील हलगी पथकासह सह सातारा येथील मुली व तरुणांच्या साहसी पथकाने चित्ततारक पारंपरिक साहसी खेळ सादर करुन उपस्थितीत शहरवासियांचे मन  जिंकुन घेतले. 

साहसी खेळात मर्दानी खेळ,दांडपट्टा,अग्नीप्रात्यक्षिकास खेळ सादर केले. पारंपरिक पध्दतीने भव्य दिव्य मिरवणूक काढुन भाविकांन सह  शहरवासियांचे मन जिंकले.

 
Top