तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील नादुंरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी  भाजपाचे निष्ठावंत कार्यकते  हणमंतराव पाटील व उपसरपंच पदी महादेवी भोकरे यांची बिनविरोध सोमवार दि. २७रोजी झालेल्या बैठकीत झाली. 

 तालुक्यातील नांदुरी येथील  ग्रामपंचायतच्या  सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीसाठी पंचायत समितीचे निवडणुक निर्णय अधिकारी   अशोक काळे यांच्या प्रमुख  उपस्थितीत सोमवार दि २७रोजी बैठक आयोजित केली होती. यात सरपंच पदासाठी  भाजपचे हणमंत पाटील यांचा एकमेव्य उमेदवारी अर्ज दाखल झाला तो छाणणीत वैध ठरल्याने निवडणुक निर्णय अधिकारी अशोक काळे यांनी सरपंच पदी हणमंतराव हरिहार पाटील यांची निवड घोषीत केली नंतर उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया होवुन त्यात सौ. महादेवी विकास  भोकरे यांची निवड झाली 

 बिनविरोध निवड होताच नुतन  सरपंच व उपसपंचाचा सत्कार करण्यात आला.     यावेळी , ग्रामसेवक दराडे  मोहन नागनाथ मुळे, माजी सरपंच शामल मोहन मुळे, मंगल चनबस, कलसुरे, सुशिल बिरु मुळेकर, भागवत लिबारी, साखरे   सदस्य सह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 
Top