उमरगा / प्रतिनिधी-

 आग मन माझं गेलं आनंदून माझा भीम यात पाहून आंग हे नाणं दिसतया शोभून बाबा साहेबांच्या फोटुन हे गीत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्याने सर्वत्र गाजले केंद्र सरकारने १९९० साली काढलेला एक रुपयांचा बंदा आज बाजारातून गायब झाला आहे. त्यामुळे पुन्हां ते नाणे बाजारात आणण्यासाठी केंद्रांनी प्रयत्न करावेत अशी मागणी आंबेडकरी जनतेतून केली जात आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त कवी राजांणंद गडपायले यांचें रुपया बंदा निगाला यंदा नव्या जमान्यात भीमराव माझा बघून घ्यावा सरकारी नाण्यात हे गीतही प्रचंड गाजले.घराघरात हे गाणे वाजले अनेकांच्या ओठावर हे गाणे सहज येऊ लागल्याने याचा धुमधडाक्यात प्रचार झाला अनेकांना नाण्याच्या विषयी उत्सुकता लागली आणि हे चलनी नाणे दिसेनासे झाले. डॉ.बाबासाहेबा प्रति असलेली प्रचंड श्रद्धा म्हणून आंबेडकर अनुयायांनी हे चलनी नाणे संग्रही ठेवले अनेकांनी त्याची फोटो फ्रेम करून देव्हाऱ्यात ठेवल्याने हे नाणे बाजारात गेलेच नाही त्यामुळे पुन्हा यांची निर्मिती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचें नाणे बाजारात उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी जनतेतून केली जात आहे.


 
Top