उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद महाराष्ट्र गोवा विधिमंडळाचे अध्यक्षपदी उस्मानाबादचे सुपुत्र ऍड मिलिंद पाटील यांची निवड झाल्याबद्दल डॉ. आंबेडकर कारखान्याचे चेअरमन तथा सहकारत्न अरविंदराव गोरे यांच्या शुभहस्ते डॉ. आंबेडकर मल्टीच्या सभागृहात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला

 प्रस्तावना करताना डॉ आंबेडकर कारखान्याचे संचालक ऍड निलेश बारखेडे पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून एडवोकेट मिलिंद पाटील यांच्या कार्याचे  विवेचन केले. 

    सत्कारमूर्ती एडवोकेट पाटील यांनी माझ्याकडून करण्यात आलेल्या अपेक्षा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले तसेच माझा ज्येष्ठाकडून झालेला सत्कार हा मला मार्गदर्शक राहील असे मत व्यक्त केले . 

  शेवटी डॉक्टर आंबेडकर मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड चित्राव गोरे यांनी एडवोकेट मिलिंद पाटील यांनी आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आभार मानले सदर प्रसंगी उपस्थित संस्थेचे संचालक मंडळ आंबेडकर परिवाराचे हितचिंतक यांचे आभार मानले

 
Top