उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सामाजिक व आर्थिक परिस्थिती मुळे बालविवाह होण्याचं प्रमाण जास्त आहे. पांेलीस यंत्रणा ही बालविवाह होवू नये यासाठी प्रयत्नशिल आहेत सर्व शासकिय यंत्रणानी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मत  पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी व्यक्त केले. 

कलापंढरी सामाजिक संस्था लातूर व क्राय संस्था यांच्या वतीने ग्रामिण भागातील बालकांच संरक्षण कार्यक्रमांतर्गत बालविवाह नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय बालसंरक्षण यंत्रणा समन्वय व सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिध अधिक्षक बोलत होते.  यावेळी डॉ. अश्रुबा कदम सदस्य बाल न्याय मंडळ बाल न्याय मंडळाचे बालविवाह व बालमजुरी विषयी भूमिका विषद केली बालविवाह संबंधी गावस्तरावर कोणकोण शासकिय व्यक्ती जबाबदार आहेत याविषयी माहिती दिली. चे पालक मुलांना सांभळू शकत नाही त्यांची सोय बाल न्याय मंडळामार्फत केली जाते. अशी माहिती त्यांनी दिली.

सुजाता माळी – सदस्य बाल कल्याण समिती- बालविवाह होण्यामागच्या सर्व कारणांचा उल्लेख त्यांनी केला व त्यावरील  उपाययोजणाची माहिती त्यांनी दिली. शशीकांत पाटील- महिला व बाल विकास कार्यालयाचे विधी सल्लागार कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. यावेळी कला पंढरी सामाजीक संस्थेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कला पंढरी सामाजिक संस्थेचे महिला समन्वयक सविता कुलकर्णी, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शिवदर्शन सदाकाळे, चाईल्ड लाईन लातुरचे बापु सुर्यवंशी, उस्मानाबाद प्रकल्पाचे कांचन भोसले, विद्या फेरे, जयश्री क्षिरसागर, निर्मला चव्हाण, अश्विनी सावंत, उमा शितोळे, शितल चव्हाण , प्रतिमा पवार, समाधान बन, सुनिता मार्कड, सरोज मसे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उस्मानाबाद प्रकल्पाचे समन्वयक आशिष लगाडे यांनी केले.


 
Top