उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  कळंब रोड, ढोकी येथील- जाकीर हबीब सय्यद यांची मोटारसायकल (क्र. एम.एच. 25 एस 1992)  अंदाजे 10,000 ₹ किंमतीची  ढोकी हिरो होन्डां स्पे्लन्डंर सय्यद यांच्या घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुन जाकीर सय्यद  यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 68/2023 हा नोंदवला आहे.

 सदर गुन्हा तपासादरम्यान   पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक  एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पो.ठा. च्या सपोनि-  जगदीश राऊत, पोलीस अंमलदार- सातपुते, क्षिरसागर, खोकले, थाटकर यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास केला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या सीडीआर/एसडीआर व तांत्रिक विश्‌लेषणाच्या आधारे (नायगाव, ता. केज )  वैभव चिंतामणी महामुनी , (वय 35 वर्षे) यास ताब्यात घेउन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुल करुन त्याने चोरी केलेली  मोटरसायकल क्र. एम.एच. 25 एस 1992 अंदाजे 10,000 ₹ किंमतीची  ही (कुभेफळ ता. केज जि. बीड) येथुन जप्त केली आहे तसेच इतर दोन मोटर सायकल त्यातील एक स्पेलन्डंर विदाऊट नंबरची जिची किंमत अंदाजे 30,000 ₹,होन्डा शाईन ( क्रं एमएच 25 व्ही 2434 ) किंमत अंदाजे 40,000 ₹ ही असा एकुण 80,000 ₹  किंमतीच्या नमूद चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन त्यास अटक केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.


 
Top