उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील वडगाव (सि) येथे प्रती वर्षा प्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम होणार असून परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

तालुक्यातील वडगाव येथे सिद्धेश्वराचे जागृत देवस्थन आहे. महाशिवरात्रीनिमित्त वडगावमध्ये मोठय़ा प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. वडगाव येथील महाशिवरात्र महोत्सव पंचक्रोषीत प्रसिध्द आहे. यावर्षीही महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये गुरुवार, 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान उजनी येथील भक्तीनाद भजन संध्या तर रात्री 9 ते 12 यादरम्यान गायनाचार्य हभप गणेश महाराज वारंगे (मादळमोही, ता. जि. बीड) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत हरीजागराचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हभप भैरवनाथ शेरकर गुरुजी यांच्या भजनाचा कार्यक्रम तर रात्री 9 ते 12 यावेळेत हभप देविदास महाराज निवळीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. महाशिवरात्री दिवशी म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 7 या वेळेत श्री. सिद्धेश्वराच्या पालखीचे गावातील सभामंडपामध्ये आगमन, 8 ते 10 या वेळात शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन, सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत भारुडाचा कार्यक्रम, 7 ते 10 या दरम्यान श्री. सिद्धेश्वर महाराजांची गावात सवाद्य पालखी काढली जाईल तर रात्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये पालखी आल्यानंतर शोभेच्या दारुच्या आतिशबाजीचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत गावातील हनुमान मंदिरात मोफत नेत्ररोग निदान व मोतीबंदू शŒाक्रिया शिबिर होणार आहे. रविवार, 19 फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात दुपारी 2 ते 6 या वेळात कुस्तीचा जंगी फडाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर 9 ते 11 या दरम्यान अप्सरा आली हा ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हे सर्व कार्यक्रम गावातील उभारण्यात येणाऱया सभामंडपामध्ये होणार आहेत. वडगाव (सि.) व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकऱयांच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top