उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पक्षाचे नेते मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनहितार्थ सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत न्या,पक्षाकडून आलेले उपक्रम पुर्ण क्षमतेने राबवावेत त्यातुनच आपलेसुद्धा नेतृत्व समाजासमोर सिद्ध होईल असे वक्तव्य आ.सुजितसिंह ठाकुर यांनी केले ते भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ता हाच भाजपाच्या कामाचा आत्मा आहे, कार्यकर्त्याने हा पक्ष वाढवला आहे व प्रत्येकाला येथे नेतृत्व करण्याची संधी मिळते. कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेतृत्व फक्त भाजपा मध्येच असल्याचे सांगीतले.

 या बैठकीस मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे यांची प्रमुख उपस्थिती होती व अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे होते.  यावेळी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी पक्षाच्या उपक्रमात जास्तीतजास्त योगदान देण्याचे आवाहन केले. युवा वॉरीअर्स शाखा स्थापना, नवमतदान नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच प्रत्येक गावात बुथ सशक्तीकरण अभियान राबवणे गरजेचे आहे तसेच यासह आगामी विविध कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे तसेच पदाधिकाऱ्यांचे सोशलमीडिया ऑडिट केले जाणार असल्याचे सांगितले.

 भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिक येथे पार पडली, या बैठकीचे संपुर्ण इतिवृत्त जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात केले.

 यावेळी महाराष्ट्र सरकारने अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेले निर्णय व त्यामुळे नागरिकांना झालेला लाभ याबाबत सविस्तर माहिती देऊन माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिंब्याचा राजकीय ठराव मांडला याला उपस्थित कार्यकर्त्या मान्यता दिली.

 तसेच किसान आघाडीचे मराठवाडा संयोजक रामदास कोळगे यांनी कृषी क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या निर्णयाबाबत अभिनंदनाचा ठराव मांडला,डॉ.प्रशांत पवार यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या अभियानाची माहिती देऊन हा कार्यक्रम प्रत्येक बुथस्तरावर घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्याचबरोबर सोशलमीडियाचा प्रभावी वापर या विषयावर पांडुरंग पवार यांनी विचार मांडले.

 या बैठकीला प्रदेश कार्यक्ररिणी सदस्य ॲड.खंडेरराव चौरे, सतिष दंडनाईक, ॲड. अनिल काळे, विक्रम देशमुख, नेताजी पाटील, दिपक आलुरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, शांताराम पेंदे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top