उस्मानाबाद / प्रतिनिधी-

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सर्वांनी शांतता आणि उत्साहात साजरा करावा, यावेळी ध्वनि आणि वायु प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत केले.

 यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश निवासी उपजिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन)अविनाश कोरडे, उस्मानाबाद-तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उपविभागीय परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश बारगजे,उस्मानाबाद नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी वसुधा फडउस्मानाबाद शहर पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक यशवंत जाधव तसेच मध्यवर्ती सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत आणि शिवराज्य अभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, शांतता समितीचे सदस्य प्रकाश जगताप, विश्वास शिंदे,मसूद शेख,ॲड.परवेज आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकरी म्हणाले, डी जे ऐवजी पारंपरिक  वाद्यांचा वापर करावा, तसेच मोटर सायकल रॅली व ऑटो रिक्षा रॅली काढतांना  ध्वनि आणि वायु प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. संभाव्य गर्दी लक्षात घेता यावेळी आठवडी बाजार रविवार ऐवजी सोमवारी भरविण्यात यावा, शहरातील रस्ते दुरुस्त करावे अशा सूचनाही जिल्हाधिका-यांनी मुख्याधिकारी श्रीमती फड यांना केल्या,.

 जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी म्हणाले,मोक्यांच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येणार असून कोणतीही अप्रिय घटना होवू नये याची काळजी पोलीस विभाग घेणारच आहे,तरी मिरवणूक व सोहळा आयोजकांनीही याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन केले.  


 
Top