उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शिंगोली आश्रम शाळा मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी  कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे कुमंत व प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवांदन करण्यात आले. 

यावेळी प्रमुख वक्ते पाटील रत्नाकर  यांनी शिवछत्रपती बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मराठा आरमाराचे निर्माते, मराठा गड , किल्ले यांचे निर्माते, सबंध जगभर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण होण्यासाठी ज्याने स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले, स्वाभिमान, मराठी बाणा, कणखरपणा, मुठभर मावळ्यांच्या साथीने बलाढ्य मोगली सैन्यांची दाणादाण उडवली अशा थोर जाणत्या राज्यांचे ‌ विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर आदर्श ठेवून देशासाठी कार्य केले पाहिजे असे आव्हान पाटील सरांनी दिले. विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली, पोवाडे सादर केली, विद्यार्थी मावळ्यांच्या वेशभूषेत आली होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक खबोले सर यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड, जाधव चंद्रकांत, सूर्यकांत बर्दापुरे, पडवळ खंडू, प्रशांत राठोड, विशाल राठोड, सुधीर कांबळे, कैलास शानिमे, मल्लिनाथ खोंदे, सचिन राठोड, सतीश कुंभार इत्यादी सहशिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, अविनाश घोडके, अमोल जगताप इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अहमदापुरे मदन कुमार यांनी मानले.

 
Top