उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 सातारा येथे संपन्न झालेल्या कुस्ती (गिरको) स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील पैलवान शंभु जाधव याचा 65किलो वजन गटात राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. 

कल्याण सागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार  सुजितसिंह  ठाकूर   यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच  संस्थेच्या सचिवा  प्रज्ञा कुलकर्णी कल्याणसागर समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार कल्याणसागर माध्यमिक विद्यालय ,डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, परंडाचे मुख्याध्यापक किरण  गरड तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.


 
Top