उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी  पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशच्या मराठवाडा संयोजकपदी श्री. पिराजी बाबुराव मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश संयोजक श्री. गणेश जगताप यांनी निवडीचे पत्र नुकतेच श्री. मंजुळे यांना दिले आहे. या निवडीचे कार्यकर्त्यांमधून स्वागत आहे.
 भाजपमध्ये अनेक वर्षांपासून विविध पदांवर जबाबदारीने काम करून पक्ष संघटन वाढविण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन या पदावर त्यांची ही निवड करण्यात आली आहे.  औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर व बीड  या चार जिल्ह्याचे संयोजक म्हणून मंजुळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 
Top