उस्मानाबाद जिल्ह्यातील वास्तुकलेचा कलाकृतींनीयुक्त अतिशय सुंदर असा वास्तू कलेचा नमुना म्हणजे माणकेश्वर येथील माणकेश्वराचे शिवमंदिर होय. हे गाव विश्वरूपा नदीच्या किनाऱ्यावरील कलाकृतीपूर्ण शिवमंदिरामुळे ओळखले जाते. पूर्वी परंडा तालुक्यात असलेल्या या गावाचा १९९९ पासून भूम तालुक्यात समावेश झाला आहे. माणकेश्वर गावापासून एक किलोमीटरवर हे ऐतिहासिक हेमाडपंथी शिवमंदिर आहे. या मंदिराच्या शैलींचे वैभव अद्याप टिकवून आहे..

माणकेश्वराचे हे शिवमंदिर त्याच्या स्थापत्य आणि शिल्पकलेवरून उत्तर चालुक्यकालीन असावे, असे म्हटले जाते. या मंदिरात उपलब्ध झालेल्या यादव राजा सिधनदेवाच्या दानलेखावरून ते यादवराजांनी बांधलेले असावे, असे वाटते. शिलालेखावर 'स्वस्ति स्त्री सकु, १९४५ सुभानु, संवछरे, माघ शुध १०, रवि, स्वस्ति स्त्री यादवकुल कमलकलिकावासी भास्कर स्त्री सिंधनदेव श्री माणकेश्वरी दत्त अक्षरं किताङः', असा मजकूर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे मंदिर उपपीठावर उभारलेले आहे. हे उपपीठ नक्षत्राकार आहे. त्यावर प्रदक्षिणा मार्ग आहे. दोन अर्धस्तंभ आणि दोन पूर्ण स्तंभयुक्त मुखमंडपानंतर चौरसाकृती मोठा सभामंडप आहे. त्यावर १० फूट उंच आणि हन फूट रूंद, असे २० नक्षीदार खांब आहेत. या खांबांवर शिव, भैरव, कृष्ण आणि इतर देवतांची शिल्प कोरलेली आहेत. मंदिरामध्ये १,५५, मौर खोल असे प्रचंड आकाराचे स्वयंभू शिवलिंग आहे. गर्भगृहावर छोटे शिखरही आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर आणि आतही सुंदर मूर्तीचा आहेत. मुख्य मंदिराच्या समोर नंदीमंडप आहे. तेथे नंदीची भली मोठी मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाह्यभागावर पद्म, देवदेवता, द अप्सरांच्या सुंदर अशा मूर्तीबरोबरच हत्तींच्या रांगा कोरलेल्या आहेत. शिवाय एक दगडी मगरही कोरलेली आहे. जिच्या मुखात दूध ओतले असता, ते सरळ गाभाऱ्यातील अभिषेक जल या मगरमुखातून बाहेरील कुंडात पडते.


 
Top