उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

दहावी-बारावी परीक्षेतील गैर प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक, बैठे पथक अशा पथकाची नििर्मती केली असून कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार आहे, अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अिधकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

१७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मध्ये घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस शिक्षणाधिकारी गजानन सुसर, उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे व इतर अिधकारी उपस्थित होते. पुढे बोलताना सीईओ गुप्ता यांनी उस्मानाबाद जिल्हयात १२ वी परिक्षेसाठी १५ हजार ९०१ विद्यार्थी बसले आहेत. त्यांच्यासाठी आठ तालुक्यात मिळुन ४० परिक्षा केंद्र राहणार आहेत. तर  दहावी परिक्षेसाठी २१ हजार ९८३ विद्यार्थी परिक्षेला बसले असून त्याच्यासाठी ८६ परिक्षा केंद्र राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परिक्षा द्यावी, असे गुप्ता यांनी आवाहन केले. 

दोन पथकांची नियुक्ती 

कॉफीमुक्त अभियानासाठी १२ वीचे महत्वाचे विषय असलेले इंग्रजी, रसायनशास्त्र व गणित यासाठी ४० बैठे पथकांची नििर्मती करण्यात आली आहे. या सर्व बैठे पथकाच्या प्रमुखांची जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अिधकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी व्हीडीओ कॉन्फरंसद्वारे बैठक घेतली आहे. भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली असून भरारी पथक प्रमुख म्हणुन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अिधकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह शिक्षणाधिकारी व इतर अिधकाऱ्यांचा समावेश आहे.  परिक्षा काळात ५० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहणार असून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. 

 
Top