तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात दोन वर्षानंतर प्रथमच घरोघरी तसेच  गावोगाव छञपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध समाजपयोगी उपक्रम घेवुन  सर्वजाती धर्माच्या मंडळीनी  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरातील श्रीगणेश ओवरीत चांदीच्या सिंहावर चांदीच्या अंबारीत विधीवत छञपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने आज देविजींच्या सिंहासनावर छञपती शिवाजी महाराज यांना सुराज्य निर्माण करण्यासाठी आशिर्वाद देत असलेली भवानी तलंवार अलंकार महापुजा मांडण्यात आली होती .

शहरातील शिवाजी चौकातील छञपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पहाटे पासुन शिवप्रेमीनी मोठी गर्दी केली होती.

आज  घरोघरी  दारासमोर रांगोळी काढुन घरावर भगवा ध्वज फडकावुन  छञपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन करण्यात आले व घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात आली.


 
Top