उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे आज 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती निमित्त संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे गावचे सरपंच प्रमोद काका वीर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार नांदे तसेच माजी सरपंच धनाजी वीर ग्रामपंचायत सदस्य विनोद मामा लावंड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्याम बापू लावंड  मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

तदनंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी केले व त्यांनी आपल्या प्रस्ताविकात शिवजयंती हा सर्व धर्मियांचा सण असल्याचे  सांगितले. व शिवाजी महाराजांच्या विचारांची ,अचारांची आज सर्व धर्मियांना गरज असल्याचे सांगितले त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली. यामध्ये वेदिका वीर, ईश्वरी निंबाळकर, प्राची तोर, वैष्णवी लावंड  ,  कृष्णार्थी देशमुख होत्या.  याला सर्वच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात व शिवाजी महाराजांच्या जयघोषात प्रचंड प्रतिसाद दिला .

 आभार प्रदर्शन श्रीमती मेहेत्रे एस एच यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती मते यांनी केले यावेळी माजी सरपंच संतोष चौगुले, श्रीपाल भैया वीर ,रमाकांत चाचा लावंड अक्षय कदम तसेच पालक हनुमंत लावंड, गणेश निंबाळकर आदीसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते तसेच शाळेतील श्रीमती डोंगरे, काळे श्रीमती कराड  , ढगे, वीर , नरवटे व  डावकरे व   माने यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 

 
Top