उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात िशवजयंतीनििमत्त गेल्या ८ दिवसापासून विविध कार्यक्रमांची मंादियाळी सुरू आहे. आज शिवजयंतीचा मुख्य दिवस असल्यामुळे शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अामदार राणाजगजितसिंह पाटील, पालकमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, राजे भुषणसिंह होळकर, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अिधकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी   यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उस्मानाबाद शहरात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती व शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळा समितीने प्रमुख पाहुणे म्हणुन होळकर घराण्याचे तेरावे वंशज भुषणसिंह होळकर यांना निमंत्रीत केले होते. भुषणसिंह होळकर यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅली शहरात काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यावर  पालकमंत्री सावत यांच्या वतीने हॅलीकॅप्टर मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली. 

आमदार पाटील यांच्या हस्ते अभिषेक

सकाळी प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील व सौ. अर्चना पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने मावळे जमा झाले होते. 

 
Top