नळदुर्ग / प्रतिनिधी-

 ऐतिहासिक नळदुर्ग शहरात दृष्टी उद्योग समुहाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आलेला खेळ रंगला पैठणीचा "होम मिनिस्टर"या कार्यक्रमाला शहरांतील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नळदुर्गच्या इतिहासात महिलांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वात मोठा ठरला. सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिक टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या जबरदस्त कार्यक्रमाने व गायनाने महिलांनी मनमुराद आनंद लुटला.

 प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या धर्मपत्नी आशाताई जगदाळे, माजी नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पुजन करून या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बाळासाहेब कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष संजय मोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष पुदाले,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हा. चेअरमन ताजोद्दीन सय्यद, संचालक रघुनाथ नागणे, सुधाकर चव्हाण, विलास पुदाले,सरदारसिंग ठाकुर, पत्रकार विलास येडगे, रुकनोद्दीन शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 खास महिलांसाठी आयोजित केलेल्या या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी आपल्या विविध कला सादर करुन धमाल उडवुन दिली होती. सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी भव्य व्यासपीठावर महिलांना विविध कला सादर करण्यास भाग पाडले. या दोघांनी आपल्या बहारदार व रुबाबदार गायनाने अक्षरशा धमाल उडविली होती. तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमास सर्व वयोगटातील २ हजार पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. मळेगावकर यांनी महिलांना विविध खेळ, कला,उखाणे  तसेच विविध गीतांवर नृत्य करण्यास भाग पाडले. महिलांनी या कार्यक्रमाचा भरपुर आनंद लुटला.

 या होम मिनिस्टर कार्यक्रमात अतीशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात  सौ. मेघा ओम बागल  ठरल्या होम मिनिस्टर. या कार्यक्रमाच्या विजेत्या व नळदुर्गच्या होम मिनिस्टर ठरलेल्या मेघा बागल यांना वॉशिंग मशिन तसेच मानाची पैठणी अशोक जगदाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेतील उपविजेत्या ठरलेल्या तनुजा सागर लकडे यांना फ्रीज देण्यात आले. त्याचबरोबर प्रतिक्षा शुभम काळे टीव्ही,सुप्रिया दत्ता हिंगे पिठाची गिरणी,शुभांगी प्रमोद पाटील कुलर,अश्विनी संतोष शिंदे गॅस शेगडी,करिश्मा बालाजी राठोड मिक्सर,अश्विनी किरण मोरे ओव्हन,सुवर्णा सोमनाथ उकरंडे होम थिएटर,दीप्ती संकेत समन कुकर व हिराबाई पाटील डिनर सेट या महिलाही या स्पर्धेत विजेत्या ठरल्या. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला अशोक जगदाळे यांच्या वतीने डिनर सेट भेट देण्यात आला. त्याचबरोबर यावेळी महिलांना हळदी कुंकु तसेच तिळगुळ देण्यात आला. 

 
Top