उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे. यांच्या ऊरूसानिमित्त मंगळवारी (दि.7) सायंकाळी साडेपाच वाजता अरब मसजीद येथे अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या डोक्यावर संदल दिल्या नंतर मिरवणुकीला उत्साहात सुरूवात झाली. मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटात तरूणाईने चांगलाच ठेका धरला होता.

शनीवार (दि.4) पासुन शहरातील हजरत शमशोद्दीन गाजी यांच्या ऊरूसास प्रारंभ झाला. ऊरूसाच्या मुख्य दिवस मंगळवारी (दि.7) संदल मिरवणुकीचा होता. मंगळवारी पहाटे पाच वाजता भुई समाजाचे प्रल्हाद धत्तुरे यांचेसह 8 जणांनी दिवसभर उपवास धरून संदल घासला. त्यानंतर दर्गाहचे मुख्य पुजारी मुजावर यांना दुपारी तीन वाजता पाण्याने भरलेला मटका सुपुर्द केला. मुजावर संदल घेवुन दुपारी तीन वाजता अरब मस्जीद येथे आले. त्यानंतर आलेम हाफिज व मुर्शद या मंडळींनी संदल समोर ठेवुन फातेहखानी (मुख्य प्रवचन) करून संदलचा पहीला मान जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर ठेवुन दिला. त्यानंतर दर्गाहचे सज्जादानशीन यांच्या डोक्यावर दिला.त्यानंतर दर्गाहचे मुख्यपुजारी मुजावर यांच्या डोक्यावर दिल्या नंतर संदल मिरवणुकीला सुरूवात झाली. ही मिरवणुक अरब मस्जीद येथुन निघुन काळा मारूती चौक, निंबाळकर गल्ली, माऊली चौक, नेहरू चौक मार्गे दर्गाह येथे मध्यरात्री बाराच्या सुमारास पोहेचली मिरवणुकीत मोठ्या संख्येने डॉल्बी होतया. शहरातील बहुतांश भागातील तरूणांनी डॉल्बीच्या तालावर मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुक उत्साहात पार पडली. अशी माहिती शेख लईक अहेमद सरकार यांनी दिली. कार्यक्रमास शेख अब्दुल गफार, मुनीर कुरेशी, गफार कुरेशी, डॉ.काजी, डॉ.रियाज लुंजे, अ‍ॅड.इम्रान गवंडी, समीयोद्दीन मशायक, अ‍ॅड. परवेज अहेमद सुबहानी, मोठ्या संख्येने जेष्ठ नागरीकांसह तरूण उपस्थित होते.

 
Top