तुळजापूर / प्रतिनिधी-

 छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवासाठी श्री तुळजाभवानी मंदीरातुन भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी सध्या  शिवप्रैमीची तिर्थक्षेञ तुळजापुरात मोठी गर्दी होत आहे. सध्या दररोज हजारो शिवज्योती श्री तुळजाभवानी मंदीरातील होमकुंडावर प्रज्वलित करुन  गावी रवाना होत आहेत. 

महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र  या भागातील शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी मंदीरात पहाटे गर्दी करीत आहेत. सध्या उन्हाची तिव्रता वाढल्यामुळे सार्वजनिक शिवजन्मोत्सव  समितीचे पदाधिकारी पहाटे एक वाजता तिर्थक्षेञी येत आहेत. पण भवानी मंदीर पहाटे चारा वाजता उघडत असल्याने पहाटे चार पर्यत महाध्दार समोर थांबुन  मंदीर उघडल्यानंतर होमकुंडावर देविच्या पोताने शिवज्योत प्रज्वलित करित गावाकडे शिवज्योत घेवुन रवाना होत आहेत.


 
Top