उस्मानाबाद/प्रतिनिधी

श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तब्बल ५४विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक ! आज या सर्व विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस-सौ प्रेमाताई सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते व मा. मुख्याध्यापक तथा प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

 उपमुख्याध्यापक एस.बी.कोळी पर्यवेक्षक-के.वाय. गायकवाड सर,पर्यवेक्षिका-सौ. बी.बी. गुंड मॅडम,पर्यवेक्षक  आर.बी.जाधव टी.पी.शेटे ,डी. ए.देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

 
Top