तुळजापूर/प्रतिनिधी

 वैद्यकीय अधीक्षक स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद-धाराशिव येथील रिक्त पदे तात्काळ भरुन  स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद  येथील सोई सुविधा वाढवाव्यात अन्यथा अल्पसंख्यांक सेना (उध्दव  ठाकरे गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा इशरा जिल्हा अध्यक्ष अमीर शेख यांनी दिला 

जिल्ह्यातुन प्रसुतीसाठी स्त्री रुग्णालयात येणारी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन या ठिकाणचे रिक्त पदे भरणे व सोई सुविधा पुरविणेबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवा, अन्यथा शिव अल्पसंख्याक सेना (ठाकरे गट) यांच्या वतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशरा  जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन जिल्हा अध्यक्ष अमीर शेख यांनी दिला.


 
Top