परंडा / प्रतिनिधी-

 परंडा तालुक्यातील रोहकल , साकत (खु ) पिस्तमवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त शपथ फलकाचे अनावरण दि.१८ रोजी करण्यात आले.येथील  बचत गटातील महिलांना पौष्टीक तृणधान्य पदार्थाचे सहकुटुंब सेवण करण्याची शपथ देण्यात आली. 

     यावेळी कृषी सहाय्यक सुहास गुंड , पं. स . चे विस्तार अधिकारी सुरज बोडके , स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक नौशाद शेख , गट समन्वयिका रेणुका सुर्वे , अन्नपुर्णा ठोसर यांच्या सह बचत गटाच्या  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . यावेळी कृषी सहाय्यक सुहास गुंड यांनी पौष्टीक तृणधान्य पदार्थाचे सेवण किती महत्वाचे आहे याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.

छाया चित्रात - रोहकल ता.परंडा येथे कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सुहास गुंड , विस्तार अधिकारी सुरज बोडके , नौशाद शेख व महिला आदी दिसत आहेत.


 
Top