उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन मंगळवार दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी, बलाई मंगल कार्यालय, कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात कळंब व परिसरातील सर्व वयोगटातील ८५५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ विश्वस्त अशोकभाऊ शिंदे व विजेंद्र अण्णा चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, बाळासाहेब सेना ता.अध्यक्ष लक्ष्मीकांत कुलजुते, शिव जयंती उत्सव समीतीचे अध्यक्ष इम्रान मुल्ला, उपाध्यक्ष राहुल वाघमारे, शिवाजी गीड्डे, अरुण चौधरी, सतपाल बनसोडे, माणिक बोंदर, गजानन सोंदे, रामभाऊ अंबीरकर, रफिक सय्यद, किरण बोराडे, शिवा शिंगणापुरे, सिध्दार्थ सोनवणे, अप्पा सावंत, मुन्ना जगदाडे, ऋषीकेश तिवारी, दत्ता शेंडगे, बाळासाहेब समुद्रे, अक्षय शिंदे, विशाल बोराडे, पोपट अंबीरकर, किशोर वाघमारे, अनंत बोराडे, अभय गायकवाड, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.दिपक बाराते, डॉ.बन्सरी पटेल, डॉ.म्रुदूल व्यास, डॉ. विजयसिंह राऊत, डॉ.नागार्जुन सोनकांबळे, डॉ.तेजस राणे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, निशिकांत लोकरे, अमीन सय्यद, विनोद ओहळ, मुकुंद खरे, आकाश पवार, संदिप खाचरे, सचिन व्हटकर व उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील सौरभ जोशी, श्रीमती पल्लवी गाढवे, मुंजाजी शिकारे यांनी परीश्रम घेतले.


 
Top