उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हयात कामगार सहकार औद्योगीक न्यायालय आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन येथील ज्येष्ठ विधीज्ञ व  गोवा -महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील यांनी केले.  येथील ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद पाटील यांची गोवा व महाराष्ट्र बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्यावतीने मानपत्र, शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सत्कार करण्यात आला. 
उस्मानाबाद जिल्हा न्यायालयातील   छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा मुख्य न्यायाधीश अंजू शेंडे, जिल्हा‌ विधीज्ञ मंडळाचे ॲड. अध्यक्ष सुधाकर मुंडे, ॲड. राम गरड, प्रबंधक लोकरे, ॲड. देशमुख, ॲड. पी.एम. नळेगावकर, ॲड. शशिकांत निंबाळकर, ॲड. सुर्यवंशी, ॲड. व्यंकटराव गुंड, ॲड. नितीन भोसले, ॲड. व्हटकर, ॲड.‌खंडू चौरे, ॲड. बागल आदीसह सर्व विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पुढे बोलताना  अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील यांनी नवोदित वकिलांसाठी भत्ता तर मृत्यू पावलेल्या वकिलांसाठी तसेच वयाची ४० वर्षे पूर्ण करून निवृत्त झालेल्या वकिलांसाठी १० लाख रुपये निवृत्ती वेतन संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी ॲड.राम गरड ,ॲड.अविनाश देशमुख ,ॲड.रविंद्र कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.प्रितीश उंबरे यांनी केले व उपस्थितांचे आभार विधीज्ञ मोरे यांनी मांडले.


 
Top