तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील मंगरुळ येथील ग्रामदैवत  श्री कंचेश्वर यात्रा महोत्सव शनिवार दि.१८ पासून महाशिवरात्री ते मंगळवार दि.२१ या कालावधित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 शनिवार दि.१८ रोजी महाशिवराञ दिनी पहाटे ५वा. श्री कंचेश्वरास विधीपूर्वक अभिषेक त्यानंतर विधीपूर्वक वाद्यवृंदाच्या निनादात श्रीच्या काठीची स्थापना होईल. सकाळी ११ते ३ उपवासाच्या पदार्थाचे अन्नदान होईल. राञी ९ते ११ ह.भ.प. शितलताई सुरनुर यांये सुश्राव्य किर्तन, रविवार दि. १९रोजी सकाळी ९ते३ मंदिराच्या सभागृहात सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम दुपारी ४ते ७  श्रीच्या काठीची व पालखीची भव्य दिव्य मिरवणूक उत्साहमध्ये उत्कृष्ट बँड पथक असुन व   शोभेच्या दारुची आतिषबाजी ,राञी ८ ते ११   ह.भ.प. रुक्मीनी ताई हावरे यांचे सुश्राव्य किर्तन राञी ११वा.  छबीना मिरवणुक व दारुची आतिषबाजी व श्री कंचेश्वराची आरती, सोमवार दि.२० रोजी सकाळी ११ ते ४ महाप्रसाद, मंगळवार दि.२१ राञी ७ ते ११ गावातील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींचा विविध गुणदर्शन सांस्कृतीक कार्यक्रम होईल .   श्रीकंचेश्वर भाविक भक्तांनी व पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन  श्रीकंचेश्वर महाशिवराञ याञा महोत्सव  समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


 
Top