तुळजापूर / प्रतिनिधी-

 लोकमंगल को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, जळकोट आणि अणदूर या तीन शाखांचे सुशोभीकरण करण्यात आले असून उमरगा शाखेचे हायवे वरील प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. मल्टीस्टेटचे चेअरमन पंडित नाना लोमटे यांच्या हस्ते या तीन शाखांचे सुशोभीकरण आणि उमरगा शाखेचे स्थलांतर यांचे उद्घाटन करण्यात आले.

मल्टीस्टेटच्या अणदूर, नळदुर्ग आणि जळकोट या तीन शाखांचे फर्निचर पूर्ण बदलण्यात आले असून या शाखांना पूर्ण नवे रूप देण्यात आले आहे. या शाखांत नवे संगणकही बदलण्यात आले असून सोयीस्कर काउंटर तयार करण्यात आले आहेत. विशेषतः बदललेल्या फर्निचर मध्ये आजवर नसलेली ग्राहकांच्या बसण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. या बदलानंतर सुशोभित करण्यात आलेल्या या तीन शाखा कार्यालयांना उत्तम रंग देण्यात आलेला आहे.

मल्टीस्टेटची उमरगा शाखा मार्केट यार्ड जवळच्या शिवाजी चौकात होती ती आता हायवे वरील बाराशे चौरस फूट अशा नव्या प्रशस्त जागेत हलवण्यात आली आहे. याही बदलानंतर फर्निचर बदलले असून काउंटर तसेच संगणक कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. उत्तम स्वच्छता गृह निर्माण करण्यात आले आहे.

मल्टीस्टेटचे चेअरमन पंडित लोमटे यांच्या हस्ते. या सर्व नव्या सुविधा आणि उमरग्याची नवी जागा यांचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे व्हाईस चेअरमन बालाजी शिंदे, संचालक शिवाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत अंंबुरे, सहाय्यक सरव्यवस्थापक संतोष माळी, सर्व शाखांचे सल्लागारव विभागीय अधिकारी गोकुळ आवरादे, मारुती काळे, शाखाधिकारी प्रदीप चौधरी, गजानन कुलकर्णी, कैलास घाटे, अशोक जाधव, सर्व कर्मचारी आणि नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top