तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरीब तसेच रस्त्यावरील बेघर नागरिकांना केवळ १० रूपयांत पोटभर जेवण मिळावे हा उद्देश ठेवून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजने केंद्रांचे बोर्ड  तिर्थक्षेञ तुळजापूरात  दिसुन येत नसल्याने अनेक गोरगरीबांना पोटाची भुक भागवणे कठीण बनले आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात दोन शिवभोजन  केंद्र असुन यातील ऐक श्रीतुळजाभवानी  मंदीर व दुसरे जुनेबसस्थानक समोर  असुन येथे प्रत्येकी शंभर अशा दोनशे शिवभोजन थाळ्या वितरीत होत  असल्याची माहीती पुरवठा विभागाने दिले.

 तिर्थक्षेञ तुळजापूरातील शिवभोजन.केंद्र गरीबाची कि हाँटेल गिऱ्हाईचा भुक भागवते  याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. सदरील शिवभोजन केंद्रावर पुर्वी  बोर्ड   होते ते आता गायब झाले आहेत.सदरील शिवभोजन केंद्र ठिकाणी आता हाँटेल आहेत त्यामुळे हाँटेल गिऱ्हाईक का शिवभोजन लाभार्थी हे कळत नसल्याने शिवभोजन वितरण केंद्र संशियाचा भोव-यात सापडले आहेत. 

   तुळजापूर तहसिल कार्यालय येथील पुरवठा  विभाग   शिवभोजन केंद्र चालु आहेत असे दावा करीत आहे माञ तिथे  हाँटेल दिसत आहेत आहे.मग शिवभोजन ताळीतील अन्न  गरीबाचा पोटात जाते कि  हाँटेल गिऱ्हाईक चा पोटात जाते याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

 महाराष्ट्र सरकारने २०२० मध्ये शिवभोजन योजनेला सुरूवात केली. त्यावेळी तुळजापूर शहरात २ शिवभोजन चालु केले होते. शिवभोजन लाभार्थींचे अपलोड होणाऱ्या फोटोची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


 
Top