तुळजापूर प्रतिनिधी- 

  टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) तुळजापूर, या सामाज कार्य शिक्षण आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेच्या परिसरात ०३, ०४ व ०५ फेब्रुवारी २०२३ ला ८ व्या महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

  या परिषदेत   राज्यभरातील ग्रामीण-दुर्गम भागातून आलेल्या महिला व त्यांच्या सोबत विकासाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या ३०० हून अधिक कार्यकर्त्या सहभागी होत आहेत.   परिषदेच्या उद्घाटन सत्रात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयच्या राष्ट्रीय समिती सदस्य, लखनौ च्या अरूंधती धुरू या बीज भाषण करणार आहेत. औरंगाबादच्या जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मंगल खिंवसरा उद्घाटन सत्राच्या अध्यक्ष असतील. तसेच समारोप सत्रात जन आरोग्य चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते, विचारवंत डॉ अनंत फडके, वरिष्ठ पत्रकार प्राजक्ता धुळप, डॉ शुभांगी अहंकारी उपस्थित असतील.  


 
Top