तुळजापुर/ प्रतिनिधी-

 येथील श्रीतुळजाभवानी मंदिर महाद्वारा समोरच  विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने माघ पोर्णिमा दिनी श्रीतुळजाभवानी  मंदीरात दर्शनासाठी जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना मोठा  ञास सहन करावा लागला.

 या पुर्वी नगरपरिषद अतिक्रमण पथक येथे गर्दीच्या दिवशी येवुन अतिक्रमण हटवत होते व दिवसभर अतिक्रमण होवु देत नव्हते पण ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबल्याने याचा ञास नाहक भाविकांना सहन करावा लागत असल्याने मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी कमचुकार अतिक्रमण पथकामधील कर्मचाऱ्यांनवर कारवाई करुन भाविकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.


 
Top