उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंह   पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन रविवार दि.०५ फेब्रुवारी २०२३ रोजी, न.प.शाळा क्रं.२३, तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात प्रभाग क्रं.१८ व १९ परिसरातील सर्व वयोगटातील ४१५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व सिध्दीविनायक समुहाचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी गट नेते युवराज नळे, माजी नगराध्यक्ष अभय इंगळे, बापु पवार, दत्ता पेठे, कमलाकर पवार, संतोष विधाते, नाना पवार, सचिन कुराडे, विजय देडे, रवि शिंदे, कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अजय घुगे, डॉ. उन्नती वाटल, डॉ.कौस्तुब केळकर, डॉ. विनायक कोकणे, डॉ.निया पाटील, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अमीन सय्यद, विनोद ओहळ, सचिन व्हटकर, पवन वाघमारे यांनी परीश्रम घेतले.

 

 
Top