उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

बालाजीगर येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल जयंती उत्सव यशस्वीपणे व शांततेत पार पाडल्याबद्दल जयंती समितीच्या पदाधिकार्‍यांचा सेवालाल महाराज महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बंजारा समाजातील नायक नायक फुलचंद राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती समितीचे अध्यक्ष अनिल राठोड व इतर पदाधिकार्‍यांचा सेवालाल महाराज महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.सुमन पवार, उपाध्यक्ष सौ.कोमल राठोड, सचिव सौ.अंजली राठोड, संघटक सौ.शाहुबाई राठोड, सौ.रतन राठोड, सौ.शालन राठोड, सौ.नीलाबाई राठोड, सौ.कविता राठोड, सहसचिव सौ.अंजली पवार, सौ.पूजा राठोड यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.


 
Top