उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पर्यावरण संवर्धन करणे  महत्वाचे आहे., असे सांगून वृक्ष लागवडीच्या चळवळीत जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन   जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी   नागरिकांना केले.  ते मानकेश्वर, ता. भुम येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. 

महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मानकेश्वर येथे ग्रामस्थंच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. जिल्हा पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी  यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थंच्या वतीने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सत्कार करण्यात आला. यावेळी परंडा व भुम येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार व मानकेश्वर येथील सन्माननीय अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थ्तिीमुळे  समस्या होउन  शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची गरज आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्या पासून जिल्ह्यातील सर्वे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले आहे.जनतेच्या रक्षणा बरोबर पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ओळखुन सर्वेच पोलीस ठाण्या बरोबर उस्मानाबाद शहर भुम तालुक्यातील हाडोंग्री, येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदीर येथे वृक्ष लागवड केली आहे. यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आणि सहकार्य मिळेल, असे सांगून मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वृक्ष लागवडीसाठी वेळोवेळी आपण सहकार्य कराणार असल्याचे आश्वासित केले.


 
Top