उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील ढोकी येथील सौ.स्नेहलता देशमुख माध्यमिक कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस 2022 परीक्षेमध्ये यश मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली आली. या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 एनएमएमएस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये सौ.स्नेहलता देशमुख माध्यमिक कन्या प्रशालेतील विनायक अशोक शिंदे, शिरीन उस्मानपाशा शेख, सुप्रिया शिवाजी पाटील, अमोल कमलाकर आदमाने हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष तथा सचिव सौ.स्नेहलता देशमुख, श्री. पांडुरंग देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुककेले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्र.मुध्याध्यापक एस.जी.कळकुंबे, शिक्षक श्री चव्हाण, श्री.कुरूळे, श्री.चव्हाण, श्री.कोतवाल, श्री.गोळे, श्री.पुंड, श्री.कांबळे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top