उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती महोत्सवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या संघाची दिंडी लोकनृत्यासाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

 दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने दि. 11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय संस्कृती महोत्सव मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या संघाची दिंडी लोकनृत्यासाठी निवड झाली असूून 18 फेब्रवारी रोजी या नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेचे  जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 कलाकारांचे पथक लवकरच मुंबईकडे रवाना होत आहे आहे. या निवडीचे आमदार कैलास पाटील, नाट्य परिषद शाखेेचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी स्वागत करुन संघातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. यापूर्वी जानेवारी महिन्यात कर्नाटक राज्यातील हुबळी-धारवाड येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवातही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या संघाने लौकिक मिळविला होता. 


 
Top