उस्मानाबाद शहर व भोवताली सुंदर अशी प्राचीन व ऐतिहासीक ठीकणे, वास्तू आणि मंदिरे पाहिला मिळतात.

आणि मग पावसाळ्यात त्यातल्यात्यात श्रावणात मग अशा ठिकाणी गर्दी होते.त्यातीलच एक असणारे ठिकाण म्हणजे चक्रतीर्थ होय. शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या श्री. बोंबले हनुमान मंदिर परिसरात हे  ठिकाण असून येथे जाण्यासाठी दरीमध्ये उतरावे लागते.या तिर्थात उतरताना आपल्याला सुंदर असा ओढा दिसतो पावसाळ्यात वरून येणाऱ्या पाण्यामुळे इथे छोटेखानी धबधबा पडतो त्यामुळे खालील बाजूस एक गोलाकार डोह तयार झाला आहे इथे पाणी चक्राकर फिरत असल्याने याला चक्रतीर्थ नाव पडले आहे. तर काही जन वेगळ्या दन्तकथा सांगतात.या चक्राच्या वरील बाजूस सुंदर असे छोटेखानी मंदिर आहे यात श्री विष्णूची समपाद उभी मुर्ती असून देवाच्या हातात शँख, चक्र, गदा इ. आयुध आहेत व या मुर्ती समोरच शिवलिंग असून त्यावर पाण्याच्या कलश बांधलेला आहे.

या मंदिराच्या बाहेर वीरगळ असून काही सातवाहन कालीन म्हणजे 2000 हजार वर्षांपूर्वीच्या विटा आहेत.या मंदिराशेजारीच सातवाहन कालीन वसाहत होती 2008 साली इथे त्याकाळातील विटाही सापडल्या होत्या. पाणी असल्याने व जवळच धाराशिव लेण्या असल्या कारणाने इथे वस्ती होती. तर तीस हजार वर्षांपूर्वी मानव वापरत असलेली सुक्ष्म हत्यारे हि या परिसरात सापडतात.सायंकाळी इथे मोरांची संख्या बघण्यासारखी असते मोरांचा केका मोठ्याने ऐकू येतो कारण डोंगर समोरासमोर असल्याने eco तयार होऊन आवाज हि घुमतो. जवळच हातलाई तलाव असल्याने इथे पशु-पक्षी हि मोठ्या प्रमाणात दिसतात त्यात पानकावळा, मोर, वेडारागु, बुलबुल, बगळे, किंगफिशर व इतर कीटक पाहिला मिळतात.   परिसरातील अबाल वृद्ध इथे पाय मोकळे करायला येतात. तर महिला गप्पा मारण्यात रमलेल्या असतात.  काही ठिकाणी रात्री दारू पिऊन बाटल्या फोडणारे हि इथे येऊन गेलेल्या खुणा दिसतात.     हाजारो वर्षांपूर्वी इथे मानवी वस्ती असावी अशा खुणा इथे आहेत वनखात्याने व नगरपालिकेने मनावर घेतले तर हे चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते इथे टेबल लॅन्ड असल्याने घोडेस्वारी, चौपाटी इ करायला वाव आहे.

                                                © जयराज खोचरे

                                               अध्यक्ष   इतिहास व पुरातत्व परिषद, उस्मानाबाद जिल्हा.

 
Top