उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहारातील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संस्थापक सरचिटणीस कै.के.टी. पाटील सर यांच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात कै.के.टी. पाटील  यांच्या धर्मादाय कार्यालय द्वारे स्मारक समिती उस्मानाबाद अशी नोंदणी केली असुन सदर पुतळा अनावरण ११ सप्टेंबर जयंती दिनी भव्यदिव्य स्मारकाचे उद्‌घाटन करण्याचा मानस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केला. 

कै.के.टी. पाटील यांच्या ९ फुट उंच पुर्णाकृती पुतळा तयार करण्याचे काम कोल्हापूर येथील डोंगरसाने आर्ट स्टुडिओ यांना देण्यात आले असुन करार हस्ते सुधीर पाटील स्मारक समिती सचिव संतोष कुलकर्णी, सदस्य आर.बी. जाधव ,बालाजी घोलप, कलाध्यापक शेषनाथ वाघ उपस्थित होते .


 
Top